सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्री: भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्रीची संधी – indian army recruitment 2021 under ncc special entry 2021 short service commission 49th course


Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नॅशनल कॅडेट कोअर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने एनसीसी स्पेशल एन्ट्रीच्या एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या ४९ व्या कोर्ससाठी जाहिरात दिली आहे. सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाचं भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२१ आहे.

पात्रता काय?

ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी घेतली आहे, ते उमेदवार सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करू शकतात. एनसीसीचे सी सर्टिफिकेट किमान बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांहून अधिक नसावे.

नवीन वर्षांत केंद्र सरकारी नोकरीची संधी; हजारो रिक्त पदे

अर्ज कसा करायचा?

सैन्यात एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे. यानंतर विचारलेली माहिती भरून सबमीट करावे. नोंदणी झाल्यानंतर आपले यूजर नेम, पासवर्डद्वारे आपले अॅप्लिकेशन सबमीट करावे.

आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्रीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ECGC मध्ये भरती

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *