शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवरकोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार होत्या. ६ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीतील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रात्री उशिरा झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात ‘ब्रेक द चेन’साठी निर्बंध लागू झाले. महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा घेणे शक्‍य नाही. त्यामुळे या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या.

या हिवाळी परीक्षा आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मधील या परीक्षा यापूर्वीही कोविड स्थितीमुळे लांबणीवर पडल्या होत्या. कुलगुरू परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणार आहेत. त्यानंतर या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

विद्यार्थ्यांना नवे सुधारित वेळापत्रक unishivaji.ac.in या विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यापीठाने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० उन्हाळी सत्र परीक्षा ६ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणार होत्या, मात्र राज्यात करोना संसर्गात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत आहेत.’

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *