यूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारीकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ .gov.in वर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. परीक्षेचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये सरकारी ओळखपत्रासह अॅडमिट कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे.

अॅडमिट कार्डात परीक्षेचे ठिकाण, रिपोर्टिंग टाइम आणि अन्य महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. यात उमेदवाराचे नाव आणि अन्य तपशीलही देण्यात आला आहे. ई-अॅडमिट कार्डावर कोणत्यााही प्रकारची चूक दिसल्यास ३ नोव्हेंबरपर्यंत us.cds-upsc@gov.in या मेलवर संपर्क साधता येईल.

UPSC CDS (II) 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड –

१) सर्वात आधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जा.
२) ‘UPSC CDS (II) 2020 ‘ वर क्लिक करा.
३) विचारलेली माहिती भरा.
४) कॅप्चा भरा.
५) अॅडमिट कार्ड आता तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल.

उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये एक काळं बॉलपॉइंट पेन घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी संपूर्ण वेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्कशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. याव्यतिरिक्त उमेदवारांना सॅनिटायझर बाळगण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा हॉलच्या आत सोशल डिस्टन्सिंगसह व्यक्तिगत स्वच्छतेचे पालन करणे देखील जरूरी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: