यशराज फिल्म्सच्या वतीनं 30,000 लोकांचं मोफत लसीकरण; लसीच्या उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या आणि पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. अशातच यशराज फिल्मसच्या यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं मजूर, तंत्रज्ञ आणि लहान कलाकारांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यशराज फिल्म्सनं इंडस्ट्रीतील एकूण 30,000 लोकाचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर यशराज फिल्मच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘द यश चोपड़ा फाउंडेशन’च्या वतीनं लिहिण्यात आलेल्या या पत्राची एक प्रत एबीपी न्यूजच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये इंडस्ट्रीमधील 30,000 कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. या पत्रात हेदेखील लिहिलं आहे की, ज्या 30,000 कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीनं मोफत लस देण्यात येणार आहे, त्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी सांगितलं की, "यशराज फिल्म्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना केवळ एकच नाहीतर दोन लसीचे डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे."
फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितलं की, "आम्हाला आशा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेडरेशन आणि यशराज फिल्म्सच्या मागणी लवकरात लवकर मान्य करतील, जेणेकरुन लसीकरणाचं हे अभियान लवकराच लवकर सुरु होण्यास मदत होईल. आमचे सगळे कर्मचारी कोरोना संकटासोबतच भूकेच्या संकटाशीही लढा देत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर लसीकरण अभियान सुरु करणं अत्यंत आवश्यक आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Corona Vaccine: लसींचा ‘राजकीय’ डोस! खरं कोण? पुनावाला की मोदी सरकार…
Corona Relief Fund : प्रियांका चोप्राच्या गिव्ह इंडिया कॅम्पेनने जमवला जवळपास पाच कोटींचा निधी!
TATA Group ‘No Limit’ Help : कोरोनाच्या संकटात मदतीसाठी टाटा समूहाचा पुढाकार, ‘नो लिमिट’ योजनेअंतर्गत 2000 कोटींची गुंतवणूक
Author: admin
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *