मुंबई विद्यापीठाचा निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर स्वीकारणारमुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील विद्यानगरी परिसरातील परीक्षा विभागातील निकाल कक्षात विद्यार्थी विविध कारणासाठी येत असतात. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात प्रत्यक्ष न येता निकाल कक्षाच्या ५ विद्याशाखेच्या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

परीक्षा विभागातील निकाल कक्ष परीक्षेशी संबधित बाबी पाहते, यात विद्यार्थ्यांचे प्रवेश अस्थायी असणे, यापूर्वीची परीक्षा उत्तीर्ण नसणे, परीक्षेत उपस्थित नसणे, तसेच निकालात काही दुरुस्ती असणे अशा विविध कारणासाठी निकाल राखीव ठेवला जातो. याची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित महाविद्यालय त्या विद्यार्थ्यांची बाब दुरुस्तीसाठी किंवा निकाल जाहीर करण्यासाठी त्याची कागदपत्रे जोडून विद्यापीठाकडे पाठविते किंवा ती कागदपत्रे घेऊन विद्यार्थी परीक्षा विभागाच्या निकाल कक्षात प्रत्यक्ष येत असतो. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी निकाल कक्षाचे पाच ईमेल तयार करून विद्यार्थ्यांसाठी एक सुविधा निर्माण केली.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या खालील ५ ईमेल वर पाठवावीत –

विद्याशाखा व त्यांचे ईमेल

१. कला शाखा निकाल कक्ष : artsresult34a@gmail.com

२. विज्ञान शाखा निकाल कक्ष :
scienceresult34b@gmail.com

३. वाणिज्य शाखा निकाल कक्ष :
commerceresult36@gmail.com

४. विधी शाखा निकाल कक्ष :
lawresult29a@gmail.com

५. अभियांत्रिकी शाखा निकाल कक्ष :
enggresult36a@gmail.com

ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *