मुंबई मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमातील आणि व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत वर्क फ्रॉम होम


मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन आणि इतर संबंधित कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये आळीपाळीने उपस्थित राहत होते. परंतु सद्यस्थितीत मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांना घरी राहून ई-लर्निंग शैक्षणिक सुविधेनुसार आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना 17 मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यत वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचे आहे. शिवाय, अत्यावश्यक कामासाठी गरज पडल्यास शिक्षकांना हजर राहण्याचे आदेशात म्हटले आहे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्राप्त धान्य, धान्यदायी मालाचे वितरण करण्यासाठी ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती आवश्यक असेल अशा शिक्षकांना शाळामध्ये बोलावण्यासंदर्भात मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावा असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज पडल्यास शिक्षकांना शाळांत हजर राहणे आवश्यक आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान घरातूनन काम करताना शिक्षकांनी आपल्या उपस्थितीच्या नोंदी शालार्थ प्रणालीमध्ये प्रक्रियेनुसार नोंदवणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

घरी राहून काम करणाऱ्या शिक्षकांनी केलेल्या कामाची नोंद गुगल शीट किंवा वर्कशीटमध्ये करुन त्याचे पर्यवेक्षण संबंधित अधिकारी यांच्याकडून करुन घेणे आवश्यक असणार आहे. या काळात  शाळा बंद असल्या तरी शालेय परिसराची स्वच्छता आणि शालेय इमारतीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक असल्याने शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी (लिपिक, शिपाई, हमाल) यांनी मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या निर्देशानुसार विभागीय कार्यालय, शाळांत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

या काळात शिक्षकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले असले तरी आणि शाळा बंद असल्या तरी मनपा कार्यालय किंवा शासन यांच्याकडून शाळासंबंधी कोणतीही माहिती मागवल्यास ती तात्काळ उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडून पत्रातील सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *