पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून तरुणीचा पळून जाण्याचा प्रयत्न


पुणे : एकीकडे पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी महापालिका व्यवस्थापनावर मोठा ताण येत आहे. त्यातच क्वारंटाइन सेंटरमधून काही नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. असाच प्रयत्न एका 18 वर्षीय युवतीने केला आहे. 

 पुणे शहरातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेंटरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याचा तिचा विचार होता. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचं ठरवलं. ही मुलगी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. कोणालाही प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येईना.अखेर अग्निशमन दलाला बोलवावे लागले. त्यांनी त्या मुलीला धीर देत खिडकीचे गज कापून तिची सुटका केली. यावेळी हायड्रलिक कटरचा वापर करावा लागला.

कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून क्वारंटाइन सेंटरसारखी ठिकाणं तयार करावी लागली आहेत. मात्र तिथूनही नागरिक पळून जात असल्याने प्रशासनाच्या समोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. ही युवती दुसऱ्या मजल्यावरून खाली जाताना जखमी झाली असती किंवा जीवावर बेतले असते तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता होती.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *