पुण्यातील खासगी शाळा अद्याप बंदचSchool Reopening: जिल्ह्यातील खासगी सोमवार ४ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांना आजपासून परवानगी देण्यात आली होती, मात्र या शाळा आज उघडल्या नाहीत.

पालिकेच्या पथकाची पाहणी, शिक्षकांची करोना चाचणी प्रलंबित असल्याने अद्याप शाळा ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉडर्न गणेशखिंड, दामले, कटारिया या शाळाही सोमवारी उघडल्या नाहीत. जोग, बालशिक्षण, एमआयटी, परांजपे, रमणबाग, भावे हायस्कूल आदि पुणे शहरातील सर्व मोठ्या शाळा सोमवारी उघडणार होत्या, मात्र त्या तूर्त तरी उघडलेल्या नाहीत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका आणि खासगी
अखेरीस चार जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. करोनाची संभाव्य दुसरी लाट आणि मुंबई, ठाणे महानगरपालिकांनी तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतही शाळा बंद ठेवण्याकडेच कल दिसत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही महानगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील खासगी आणि महापालिकांच्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शाळा १४ डिसेंबरला सुरू करायच्या की नाहीत, याचा निर्णय होणे अपेक्षित होते. पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या शाळा पुन्हा तीन जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला.

यानुसार, सोमवारी ४ जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होणार होत्या, मात्र शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या न झाल्याने शाळांना पुन्हा ब्रेक लागला आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *