पंतप्रधान आज सायंकाळी करणार 'परीक्षा पे चर्चा'; कार्यक्रम कुठे पाहाल..जाणून घ्याPariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता देशातील तमाम विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. ते आपला बहुचर्चित कार्यक्रम वार्षिक कार्यक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ च्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी लाइव्ह संवाद साधतील. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या ‘परीक्षा पे चर्चा’ () कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं हे चौथे वर्ष आहे. यासंदर्भात एका टि्वटमध्ये पंतप्रधानांनी (PM Modi) म्हटले आहे की, ‘एक नवा फॉरमॅट, विविध विषयांवर एका विस्तृत श्रृंखलेवर अनेक प्रश्न आणि आपल्या साहसी एक्झाम वॉरियर्स, पेरेंट्स आणि टीचर्ससह अविस्मरणीय चर्चा. पहा ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता .’ या कार्यक्रमाचं आयोजन व्हर्चुअल पद्धतीने केलं जाणार आहे.

पंतप्रधान देणार एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी टिप्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांमधील बोर्ड परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन करण्यासंबंधी टिप्स देतील. पीपीसी कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकदेखील प्रश्न विचारतात. या प्रश्नांची लाइव्ह उत्तरे पंतप्रधान कार्यक्रमात देतात. यावर्षी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. सुमारे १२ लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पंतप्रधानांशी लाइव्ह संवाद साधणार आहेत. या विद्यार्थ्यांची निवड स्पर्धेद्वारे करण्यात आली आहे.

असा पहा ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम

भले ही ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम सोशल मीडिया वर लाइव्ह संवादादरम्यान निवडलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकच प्रश्न विचारू शकतील, मात्र अन्य सर्व इच्छुक विद्यार्थी ही चर्चा लाइव्ह पाहू शकतील. ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, ट्विटर आदि वर पाहता येईल. लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थी ‘MyGovIndia’ के ट्विटर हँडल फॉलो करू शकता.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *