परीक्षा कधी घेतली जाईल?
२०२१ परीक्षा १८ एप्रिल रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल. ३१ मे पर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
पीजी २०२१ साठी पात्रता
उमेदवारांकडे नीट पीजी २०२१ साठी पात्र होणअयासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेचे MBBS पदवी (तात्पुरती किंवा कायमस्वरूपी) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवारांकडे एमसीआय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र देखील असले पाहिजे. नीट पीजी २०२१ उमेदवारांनी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली असली पाहिजे.
नीट पीजी प्रवेश परीक्षेद्वारे १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि १,९७९ पीडी डिप्लोमा जागांवर ६,१०२ शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो.