चांगली बातमी! राज्यात आज पुन्हा नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त



<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : राज्यात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. आज राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे.</p>
<p style="text-align: justify;">राज्यात आज 891 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.</p>

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *