गोंदियात कोरोनाची शाळांमध्ये एन्ट्री, पाचवी ते 11 वी पर्यंतच्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रवेश झाला आहे. गोंदियातील 18 शालेय विद्यार्थी आणि 7 शिक्षकांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत 5 वी ते 11 वीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. यातच मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढीला सुरूवात झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. गोंदिया तालुक्यात 11, सडक-अर्जुनी तालुक्यात 2, सालेकसा तालुक्यात 2, अर्जुनी मोरगाव तालुक्यात 1, तिरोडा तालुक्यात 1, आणि गोरेगाव तालुक्यात 1 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.असे एकूण 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच गोंदिया तालुक्यात 5, देवरी तालुक्यात 1, आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली असून असे एकूण 7 शिक्षक कोरोना बाधित झाले आहे. सध्या विद्यार्थी आणि शिक्षण विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात तपासणी दरम्यान विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे खळबळ उडाली.असल्याने जिल्हा प्रशासनने येत्या 31 मार्चपर्यंत 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद करण्याचे आदेश काढले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात आजपर्यंत जिल्ह्यात 14 हजार 942  कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 14 हजार 392 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्याच्या घडीला 363 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 266 कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर 97 कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *