कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली सेट परीक्षा आता २७ डिसेंबरला2020: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (स्टेट एलिजिबीलिटी टेस्ट – SET) २७ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

ही परीक्षा आधी २८ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोविड – १९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठातर्फे संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांचे यशस्वी आयोजन

सोमवारी २६ ऑक्टोबर २०२० रोजी ६६,०२७ विद्यार्थी ऑनलाइन परीक्षांसाठी तर ४०५६ विद्यार्थी ऑफलाइन परीक्षांसाठी अपेक्षित होते.
त्यापैकी ६५६१८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाईन पध्द्तीने परीक्षा दिली, तर २८२२ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली आहे.

सेट परीक्षा २०२० बाबतच्या अधिक माहितीसाठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: