कर्नाटकात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्री येदियुरप्पांकडून चौकशीचे आदेश
कर्नाटक : कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. जिल्हा प्रशासानानं रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं मान्य केलंय, मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं नाहीत, तर रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळं झाले, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. विशेष म्हणजे, 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे 60 सिलेंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्यानं हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण घटनेनंतर 60 सिलेंडर रुग्णालयात दाखल

दरम्यान, जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे की, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीतर इतर आजारांमुळे झाला आहे. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरुन स्पष्ट होतंय की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचा जीव गेलाय. संपूर्ण घटनेनंतर 60 ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत.

या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येदियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच प्लान नाहीये, असं म्हणत काँग्रेसनं आरोप केले आहेत.

पाहा व्हिडीओ : कर्नाटकच्या चमराजनगर शासकीय रुग्णालयात 24 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 37 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

दरम्यान, कर्नाटकात गेल्या 24 तासांत 37 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या महामारीच्या विळख्यात अडकून 217 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच एकूण आकड्यांबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत कर्नाटकात एकूण 16 लाख 1 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 16 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Lockdown | कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश

Coronavirus Cases : गेल्या 24 तासांत देशात 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, तर तीन लाख 68 हजार कोरोनाबाधितांची नोंद

Goa Lockdown : गोव्यात 5 दिवसांच्या लॉकडाऊननंतर 8 दिवसांसाठी कठोर निर्बंध; काय सुरु, काय बंद?

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *